देगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा

Maharashtra varta

 




कापूरहोळ( प्रतिनिधी)

देगाव (ता. भोर): देगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मधुकर यादव हे होते. यावेळी सावंत मॅडमचव्हाण मॅडम उपस्थित होत्या नियोजन विठ्ठल पवार यांनी केले.

या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भाषण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शेतीचे महत्त्व, शेतकऱ्यांचे योगदान आणि आधुनिक कृषीविषयक विचार प्रभावीपणे मांडत स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास केंद्रप्रमुख साधना गायकवाड यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी शेतीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांनी कृषीविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि नियोजन समितीचे विशेष अभिनंदन केले. महाराष्ट्र कृषी दिनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी जागरूकता निर्माण होऊन कृषी क्षेत्राबद्दल आदराची भावना दृढ झाली.

To Top