शेतकरी पुत्र महेश टापरे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरवण्याची सर्वसामान्य जनतेची मागणी.

Maharashtra varta

 


भोर तालुक्यातील कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गटात आज सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे — “यंदा जनतेचा उमेदवार हवा, जनतेसाठी लढणारा हवा!” आणि त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे एक नाव — महेश टापरे

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले, साधेपणातही प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता जपणारे शेतकरी पुत्र महेश टापरे हे गेली अनेक वर्षे समाजातील विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आले आहेत.त्यांची खासियत म्हणजे — कोणत्याही राजकीय घराण्याची पार्श्वभूमी नसताना त्यांनी आपल्या कर्तृत्व, संपर्क आणि नेतृत्वातून समाजात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

जनतेच्या मनात घर करणारा चेहरा

महेश टापरे हे केवळ एक नाव नाही, तर कामथडी-भोंगवली गटातील जनतेच्या अपेक्षांचं प्रतीक बनले आहेत. गावागावात फिरून त्यांनी जनतेच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यासंबंधीचे प्रश्न सातत्याने उचलले आहेत. त्यांचा संवाद नेहमी थेट, स्पष्ट आणि लोकांच्या भावनांना भिडणारा असतो.

वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा संगम

महेश टापरे यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे वक्तृत्वाची धार, कर्तृत्वाची सातत्यता आणि नेतृत्वाचा आत्मविश्वास.स्थानिक तरुणांना त्यांनी एकत्र करून राजकीय पक्षविरहित युवक संघटनं उभी केली, जी आज समाजातील विविध उपक्रमात सक्रिय भूमिका बजावत आहेत.शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा सहभाग सातत्याने जाणवतो.

 अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व

महेश टापरे हे प्रत्येक विषयाचा अभ्यास करून बोलणारे, प्रत्येक निर्णयात तर्क आणि जनतेचा हित विचारात घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या संवादातून आणि कृतीतून समाजाच्या प्रगतीसाठी असलेली तळमळ प्रकर्षाने दिसते.

त्यांनी भोर तालुक्यातील अनेक तरुणांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित केले आहे.

जनतेचा उमेदवार” म्हणून सर्वसामान्यांचा आग्रह

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पंचायत समिती गणात कार्यरत असलेले कार्यकर्ते, शेतकरी, महिला आणि युवक या सगळ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे  “या वेळेस महेश टापरे यांनीच जिल्हा परिषद निवडणूक लढवावी!”लोकांमध्ये असा विश्वास आहे की, त्यांच्यासारखा प्रामाणिक आणि जमिनीवरचा उमेदवारच खऱ्या अर्थाने गावांच्या विकासासाठी झटेल.

जनतेचा थेट संपर्क

टापरे यांनी पक्षीय राजकारणाऐवजी लोकांशी थेट संवाद साधत सामाजिक विश्वास कमावला.

शेतकरी पार्श्वभूमी: त्यांच्या कार्याचा पाया शेती आणि ग्रामीण जीवनाशी घट्ट जोडलेला आहे.

युवकांसाठी प्रेरणास्थान: त्यांनी युवकांमध्ये नेतृत्व, संघटन आणि समाजसेवा याची नवी उर्मी निर्माण केली.

विकासाभिमुख दृष्टीकोन: प्रत्येक गावात मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील.

 जनतेची भावना स्पष्ट आहे

 “आता वेळ आली आहे आपल्या गटाला खरं नेतृत्व देणाऱ्या, जनतेच्या मनातला उमेदवार पुढे आणण्याची... आणि तो म्हणजे महेश टापरे!”

To Top