वेळू गणात भारतीय जनता पक्षाकडून अशोकभाऊ वाडकर यांच्या उमेदवारीचे संकेत; युवा वर्गात उत्साहाचे वातावरण.

Maharashtra varta

 


पुणे (प्रतिनिधी):

भोर तालुक्यातील वेळू गणातून होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून अशोकभाऊ दिनकर वाडकर यांच्या उमेदवारीला जोरदार चर्चा मिळत असून, त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.अशी सूत्रांची माहिती आहे.

त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे, सामाजिक कार्यामुळे आणि सर्वसमावेशक कार्यशैलीमुळे त्यांचं नाव आज वेळू गणातील चर्चेचा प्रमुख विषय ठरलं आहे.

ससेवाडी (ता. भोर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून संघर्षातून उभे राहिलेले अशोकभाऊ वाडकर हे ITI (Mechanical) शिक्षण घेतलेले असून, मागील 15 वर्षांपासून सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय आहेत. राजकारणात कुठलीच पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या मेहनतीवर आणि लोकसंपर्कावर त्यांनी जनतेत वेगळी ओळख निर्माण केली आहे.अशोकभाऊ वाडकर हे 'भगवे वादळ प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत त्यांनी भोर तालुक्यातील विविध गावांमध्ये सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून युवकांमध्ये एकात्मतेचा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात त्यांनी गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून समाजाप्रती आपली जबाबदारी जपली.त्यांनी भोर राजगड प्रीमियर लीग आणि शिवगंगा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून युवकांच्या सांघिक शक्तीला आणि क्रीडाविकासाला दिशा दिली आहे. वाडकर एंटरप्राइजेस, संस्कृती पेट्रोलियम प्रा. लि., पोल्ट्री फार्म आणि हॉटेल व्यवसायाद्वारे त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.त्यांच्या उद्योगधंद्यातून आणि समाजकार्यातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.वेळू गणातील युवक, शेतकरी, आणि सामाजिक घटकांमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून —

वेळू गणाला सामाजिक भान असलेला, सर्वसामान्यांचा उमेदवार अशोकभाऊ वाडकर असणार आहे,”असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.

(भोर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये अशोकभाऊ वाडकर हे नव्या दमाचे, कार्यकर्त्यांना सोबत घेणारे आणि विकासाभिमुख विचारसरणीचे उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या  संभाव्य उमेदवारीमुळे वेळू गणातील निवडणुकीला नवचैतन्य होताना दिसणार आहे)

To Top