📰✨ दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने केंजळ प्राथमिक शाळेला अद्ययावत स्वच्छतागृह ✨🚻
सेवा सहयोग संस्थेच्या प्रयत्नांतून भोर तालुक्यातील १८ व्या आणि पुणे जिल्ह्यातील २५ व्या स्वच्छता गृहाचे हस्तांतरण नुकतेच पार पडले.
सेवा सहयोग व ह्युमॅनिटरियन ग्रुपच्या प्रयत्नानी शिवाजीनगर, पुणे येथील साईबाबा मंदिरच्या विश्वस्तांच्या आर्थिक सहयोगातून व तालुक्यात भरीव शैक्षणिक कार्य करणाऱ्या रचना संस्थेच्या समन्वयाने केंजळ शाळेला मुलामुलींसाठी स्वतंत्र नूतन स्वच्छता गृह बांधून देण्यात आले. किशोरी मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन देखील या ठिकाणी बसविण्यात आले.
मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी अतिथींचे स्वागत केले. मुलांच्या समधुर स्वागत गीताने व प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. श्रीपाद कोंडे यांनी मुलांना स्वच्छता पालनाची शपथ दिली. मृणाल सोमण, तुकाराम गायकवाड व श्री. रासने साहेब यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
यावेळी साईबाबा मंदिर ट्रस्ट चे दिलीप रासने, गिरीश रासने, दामोदर बोकील, शेखर समेळ, किरण अस्तगावकर तसेच सेवा सहयोग व ह्युमॅनिटरियन ग्रुपचे तुकाराम गायकवाड, शोभा गायकवाड, संजय राठी, अरुण सोमण, मृणाल सोमण, अश्विनी हर्षे, माधव जोशी त्याच प्रमाणे रचना संस्थेचे समन्वयक श्रीपाद कोंडे सर, माधुरी उंबरकर, शुभांगी घाडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुषमा बाठे, उपसरपंच किरण येवले, शाळेचे मुख्याध्यापक जे. के. पाटील, त्यांचे सहकारी शिक्षक व सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
🌿 या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी एक मोलाची पायरी उचलली गेली असून गावातील शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळाली आहे. 🙌

