भोर तालुक्यातील करंदी–खे.बा.चा हा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. पुणे सातारा महामार्गापासून गाव 4 किलोमीटर अंतरावर आहे,या गावच्या रस्त्यावरील खोल खड्डे, चिखल आणि डबकी,साचलेले पाणी, यामुळे चारचाकी, दुचाकी तसेच पायी प्रवाशांना देखील मोठ्या धोक्यातून प्रवास करावा लागत आहे. शाळा–कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, कामासाठी निघालेले कामगार, महिला वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक रोजच्या रोज या संकटाचा सामना करत आहेत. अपघाताचा धोका प्रत्येक पावलावर जाणवतो आहे.
याची साक्ष म्हणून आजचा समोर आलेला हा फोटोच पुरेसा आहे. रस्त्याच्या निकृष्ट स्थितीमुळे वाहने खोलवर रुतून जात आहेत, तर काही वेळा अपघातही टळत नाहीत. अशा परिस्थितीत करंदी–खेबाचा हा रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून तातडीने दुरुस्ती आणि विकासाची गरज भासत आहे.
आज सायंकाळी साडेपाच वाजता करंदी हून कामथडीकडे जाणारा कंटेनर रस्त्यातच चिखलात अडकला,रुतून बसला, की कंटेनर बाहेर काढण्यासाठी जेसीबी ची मदत घ्यावी लागली
रस्ता द्या सुरक्षित, जनतेला द्या दिलासा" – अशीच मागणी आता ग्रामस्थ आणि प्रवासी करत आहेत.

