महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळू, ता. भोर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. इयत्ता चौथीच्या 40 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 38 विद्यार्थी पात्र ठरले

Maharashtra varta




भोर, ता. भोर : महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळू, ता. भोर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. इयत्ता चौथीच्या 40 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 38 विद्यार्थी पात्र ठरले असून, इयत्ता सातवीमध्येही 18 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

इयत्ता चौथीच्या परीक्षेत प्रयाग रुपेश पांगारे (240 गुण) याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ अर्पिता रोहित प्रजापती (222), गौरी रामदास बारटक्के (220), मुदब्बीर रमजान शेख (210), देवांश भास्कर डोरले (208), रिया सूर्यकांत दूरकर (208), शौर्य मनोज कांबळे (206) आणि स्वरा संदीप यादव (206) यांनी विशेष गुणवत्तापूर्वक यश संपादन केले.


याशिवाय शिवम पांगारे (198), सहाना शेख (194), दीपांशु नवरंगे (194), शौर्य शिंदे (192), मोनिका राठोड (190), आराध्या कुंटे (188), वैष्णवी डांगे (186), शुभम प्रजापती (186), स्वरांजली मीढे (186), आदिराज सोनवणे (184), रुद्र वाडकर (182), अभिमन्यू पांगारे (178), आदित्य राम (178), शिवन्या पाटील (174), रिया पाल (172), हरीकिसन राजभर (166), अद्वैत कोळपे (160), वैभवी डांगे (158), अर्णव जाधव (156), रुद्र सुर्वे (152), आरुषी सरकटे (152), रितिक लोहार (150), आकाश प्रधान (148), पियुष कुमार गुप्ता (146), वैधवी माने (140) आणि साधू गवळी (136) यांनीही पात्रता मिळवत शाळेच्या यशात मोलाचा वाटा उचलला.


इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिद्धार्थ पांगारे (202), साक्षी गवळी (192), अनिता बांगर (190), कल्याणी साठे (186) आणि स्वरा रेणुसे (180) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या गटातील एकूण 18 विद्यार्थी पात्र ठरले.


या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण गोसावी, उपाध्यक्ष शिवाजी पांगारे व सर्व सदस्य, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर पांगारे, भोर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख अमोल पांगारे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पांगारे यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.


विद्यार्थ्यांच्या या यशामागे वर्गशिक्षिका सौ. रूपाली वृंदावन मुजुमले, श्रीमती प्रीती वसंत घुले, मुख्याध्यापिका सौ. नेहा अनिल शिगवण, वर्गशिक्षिका सौ. वैशाली सूर्यवंशी तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, परिश्रम आणि नियोजनबद्ध अध्यापन यांचा मोलाचा वाटा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळूच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



To Top