न्यूज वार्ता मुख्य संपादक.
भोर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सक्रिय युवा नेते विशाल बंटी कोंडे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. या घडामोडीने नसरापूर परिसरात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते पुणे येथील सर्किट हाऊस मध्ये संपन्न झाला. यावेळी भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, बँकेच्या संचालिका निर्मलाताई जागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत बाठे, जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, तसेच युवा नेते विक्रम खुटवड यांची उपस्थिती होती.
विशाल कोंडे यांनी भाजपमध्ये कार्यरत असताना अनेक सामाजिक व युवा प्रश्नांवर आवाज उठवत ठोस कामगिरी केली होती. त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते हा पक्षाला मोठा ताकदीचा आधार ठरणार आहे.
या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भोर तालुक्यात ऊर्जा आणि घनदाट कार्यकर्त्यांची फळी मिळाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
यापुढील राजकीय समीकरणे कोणत्या दिशा घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.