उद्योगपती शिरीष तांगडे यांच्या वाढदिवसाचे अनोखे स्वागत – हरिश्चंद्री शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Maharashtra varta


सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाची भर

हरिश्चंद्री (ता. भोर) :प्रसिद्ध उद्योगपती श्री. शिरीष तांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिश्चंद्री येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून हा विशेष दिवस अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रंगीत वही, ड्रॉइंग साहित्य आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून केवळ वाढदिवस साजरा न होता, तर ग्रामीण भागातील शिक्षणप्रेमाला बळकटी मिळाली.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. स्वप्निल गाडे पाटील पालकवर्ग तसेच शाळेतील शिक्षक विठ्ठल पवार सर विशेषतः उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हा या उपक्रमाचा सर्वात मोठा यशोगाथा ठरला. शिरीष तांगडे यांचा हा सामाजिक जाणीवेतून घेतलेला पुढाकार इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे मत शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे गावात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून ग्रामीण शिक्षणात अशा सामाजिक हातभाराचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

`#ShirishTangade #HarishchandriSchool #EducationalDonation #SocialResponsibility #ZPschool #वाढदिवस_सामाजिक_दृष्टिकोनातून`


--

To Top