राजगड पोलीस स्टेशनच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आरपीआयचे बोंबाबोंब आंदोलन

Maharashtra varta

 


खेड शिवापुर  (प्रतिनिधी)

राजगड पोलीस स्टेशन नसरापूरच्या एकंदरीतच मनमानी व भोंगळ कारभाराच्या विरुद्ध आरपीआयचे आठवले गटाच्या वतीने  पोलीस अधीक्षक कार्यालय पाषाण या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं 

राजगड  पोलीस कर्मचाऱ्यांच्या उद्धट व बेकायदेशीर मनमानीला आळा बसावा त्याचबरोबर बेकायदेशीररित्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तपास प्रक्रियेत  हस्तक्षेप करणाऱ्या पत्रकाराच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी राजगड पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक राजेश गवळी यांची तात्काळ बदली करावी अशा अनेक मागण्यांकरिता आज आरपीआय आठवले गटाचे कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं 

आंदोलन कर्त्याच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून संबंधित पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येईल मंगळवार पर्यंत खातेनिहाय चौकशीचा अहवाल आल्यानंतर  दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं

To Top