कापूरहोळ (प्रतिनिधी):-●विठ्ठल पवार सर●
धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान पंचक्रोशी कापूरहोळ व वीर धाराऊ माता स्मारक ट्रस्ट शंभूतीर्थ कापुरव्होळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंभूतीर्थ, कापूरहोळ (ता. भोर, जि. पुणे) येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य – वह्या व दप्तराचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी प्रमुख उपस्थिती धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर दादा गाडे पाटील आणि धाराऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित दादा गाडे पाटील यांची होती. यांच्यासोबत डेक्कन कोल्ड स्टोरेजचे मॅनेजर संदीप दादा इंगुळकर,गोरक्ष अहिरे, सचिन वीर, श्रीकांत गाडे, रामदास गाडे, मोहम्मद शेख यांचीही उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सुजाता कुंभार मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर आदर्श शिक्षक अनंता मोरे सर यांनी आभार मानले. पोतदार मॅडम व इतर शिक्षक, ग्रामस्थ मंडळ आणि पत्रकार राजू वाघमारे ,तुषार सणस यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गोडी वाढेल व त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस बळ मिळेल, असा विश्वास परिसरातील पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केला.