भोर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांची उन्हाळी सुट्टीतील कमाल कॅम्पला भेट .

Maharashtra varta

 


कापूरहोळ (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार सर●

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व रचना संस्था संयुक्त पणे उन्हाळी सुट्टी मध्ये भोर तालुक्यातील ११० गावांमध्ये शालेय मुलांसोबत ' कमाल कॅम्प ' कार्यक्रम राबवित आहे. " खेळ व मनोरंजक शैक्षणिक साहित्य, चित्रकला, कविता,कथा,वाचन-लेखन, या माध्यमातून सुट्टीत मुलांना क्षमता वृद्धीच्या उपक्रमात हसत खेळत निरंतर ठेवण्यासाठी हा विशेष प्रयत्न सुरु आहे," असे प्रथमचे योगेश गरुड व रचना संस्थेचे श्रीपाद कोंडे यांनी सांगितले. गाव स्तरावर मुलांसोबत हा अनोखा उपक्रम माता,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व किशोरवयीन मुली स्वयंसेवी पद्धतीने राबवीत आहेत. 

     भोर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी आळंदे, मोरवाडी,काळेवाडी ,करंदीखे.बा.,कामथडी,माळेगाव येथील या उपक्रमास भेट देऊन मुलांशी संवाद साधला. कमाल कॅम्पचे कौतुक करताना ते म्हणाले,"विविध आनंददायी माध्यमातून हा कार्यक्रम राबवल्याने पालक व शाळा व्यवस्थापन समित्यांचा शिक्षणात सहभाग वाढण्यास मदत होत आहे. यातून मुलांमधील अभ्यासाची रुची निरंतर राहील." 

     यावेळी करंदी खे.बा.चे सरपंच नवनाथ गायकवाड, पो.पाटील विजय कव्हे,कामथडीचे ग्रामसेवक संतोष गुंडले आणि प्रथम संस्थेचे योगेश गरुड,सविता टापरे,प्रशांत कांबळे तसेच रचना संस्थेचे समन्वयक श्रीपाद कोंडे,माधुरी उंबरकर,शुभांगी घाडगे,करिष्मा बोबडे,सुजाता भोरडे,मयुरी पवळे व माता पालक आणि वर्गांचे विद्यार्थी उपस्थित होते.

To Top