कापूरहोळ (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार सर.
भोर तालुक्यातील तेलवडी गावात विकासकामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, गावाच्या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण तसेच लक्ष्मी माता समाज मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन भाजप भोर तालुका अध्यक्ष मा. श्री. संतोष धावले तसेच मा. डोंगरी विकास परिषद सदस्य श्री. विश्वासराव ननावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजप कार्यकर्ते माऊली पांगारकर, संदीप खोपडे, गणेश शेडगे, तसेच गावातील सरपंच, व उपसरपंच गणेश धावले, सदस्य सचिन धावले, आणि ग्रामस्थ कैलास धावले, पोपट धावले, विजय धावले, किरण धावले, बाळू धावले, भगवान धावले, गौतम ओव्हाळ, संदीप धावले, चंद्रकांत धावले, चेतन धावले, सुशांत खोपडे, संजय धावले, ऋषिकेश धावले, अनिकेत धावले, धीरज धावले, गिरीश धावले आदी मान्यवर उपस्थित होते.
ठेकेदार विकास मालुसरे, ओंकार धावले यांनी कामाची माहिती दिली. **जय हनुमान तरुण मंडळ, तेलवडी** तसेच **समस्त ग्रामस्थ मंडळ, तेलवडी** यांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला.
या भूमिपूजनामुळे गावात विकासकामांना चालना मिळणार असून, ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाबद्दल सर्व मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.