गुरुकुलचा दहावीचा निकाल १००% – यशाची नवी उंची गाठत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले!

Maharashtra varta





कापूरहोळ (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार●

नायगाव (ता. भोर) येथील शिक्षण हीच खरी शक्ती मानणाऱ्या नवसह्याद्री गुरुकुल आणि ज्युनिअर कॉलेज, नायगाव या प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १००% निकाल लागवून शैक्षणिक गुणवत्तेची ठोस छाप उमटवली आहे.

या यशामध्ये पहिल्या पाच क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत:

1. दिव्या दत्तात्रय कोंडे – 94.40%

2. भविष्य गणेश आकटोकार – 93.00%

3. प्रांजल उमेश शिळीमकर – 93.00%

4. प्राप्ती संजय डिंबळे – 91.80%

5. जय संदेश पवार – 91.20%

6. सुखदा गणेश गोळे – 89.00%

याचबरोबर ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी ७५% (Distinction) पेक्षा जास्त गुण मिळवून संस्थेच्या गुणवत्तेची साक्ष दिली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. पोपटराव सुके साहेब यांनी प्रथम क्रमांकासह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. याशिवाय, त्यांनी शाळेच्या  संचालिका सौ. सानवी सुके मॅडम, कार्यक्षम मुख्याध्यापिका सौ. वर्षा धुमाळ मॅडम तसेच अखंड मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही विशेष कौतुक करून त्यांच्या योगदानाची दखल घेतली.

शिस्त, अभ्यास, मार्गदर्शन आणि संस्कार यांचा संगम असलेल्या नवसाह्याद्री गुरुकुलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ग्रामीण भागातही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची श्रीमंती रुजलेली आहे.

To Top