श्री शिवाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल ९९.०२% — गुणवंत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

Maharashtra varta




कापूरहोळ( प्रतिनिधी) :-विठ्ठल पवार सर●

(ता. भोर) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नसरापूर या नामवंत संस्थेने एस.एस.सी. मार्च २०२५ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १०३ विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९९.०२ टक्के निकालाची नोंद झाली आहे. या घवघवीत यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण आहे.


या यशामध्ये खालील विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली आहे:


 सावंत हर्षद राजेंद्र – ८९.४०% (प्रथम क्रमांक)

 कु. शेलार समीक्षा सुरेश – ८८.४०% (द्वितीय क्रमांक)

 कु. कुंभार समीक्षा नामदेव – ८८.२०% (तृतीय क्रमांक)


या विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या बाबतीतच नव्हे तर शालेय जीवनात शिस्त, एकाग्रता आणि सातत्य या गुणांतून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरावी असे उदाहरण निर्माण केले आहे. शाळेचे प्राचार्य  संजय यादव सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे, तर शिक्षकांचे, पालकांचे आणि संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे.”

या यशाचे श्रेय सर्व विषय शिक्षक, वर्गशिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला जाते. तसेच, शाळेचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक वातावरण हे देखील या घवघवित निकालामागील महत्वाचे घटक आहेत.

एक विद्यार्थी नापास झाल्याची नोंद असूनही, संपूर्ण निकालाची गुणवत्ता ही अत्यंत उत्कृष्ट असून विद्यालयाचा गुणवत्तेचा आलेख अधिक उंचावला आहे.

 विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

शाळेच्या यशाला आणि गुणवंत परंपरेला सलाम!




To Top