दुर्दैवी अपघात! पाण्याची मोटार सुरू करताना विजेचा जोरदार धक्का – ३६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू कामथडी (भोर) गावात शोककळा; राजेंद्र खुटवड यांचं अकाली निधन.

Maharashtra varta




कापूरहोळ (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार सर●

भोर तालुक्यातील कामथडी येथील खुटवडवस्तीमध्ये बुधवारी दि.14 मे रोजी  दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. या गावातील रहिवासी राजेंद्र चंद्रकांत खुटवड (वय ३६) हे घरासमोरील पाण्याची मोटार सुरू करत असताना अचानक विजेचा जबरदस्त शॉक बसला. काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले.

नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्यांना नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

राजेंद्र खुटवड यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, विजेच्या साधनांच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृतीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

To Top