नसरापूर (ता. भोर) |■पत्रकार विठ्ठल पवार■
दिनांक १ मे २०२५, गुरुवार —पूणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज, नसरापूर येथे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रप्रेमाने भरलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री. यादव एस. एस. यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. पाटील मॅडम, तसेच विभागप्रमुख श्री. मिसाळ सर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता ५ वी ते ९ वी व ११ वी (कला, वाणिज्य, विज्ञान शाखा) च्या निकालपत्रांचे वितरण. यामध्ये उज्ज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव विद्यालयाचे प्राचार्य व विभागप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
प्राचार्य श्री. यादव सर यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना पुढील गोष्टींवर भर दिला:
- गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे,
- शिक्षकांनी अध्यापन पद्धतीमध्ये बदल करत विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे,
- नवतंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षण अधिक प्रभावी करावे.
विशेष म्हणजे, प्राचार्य यादव सरांनी इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी Artificial Intelligence (AI) विषय सुरु होणार असल्याची माहिती दिली. या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक साक्षरता आणि भविष्यातील करिअर संधींना चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई मामा यांच्यासह विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन "महाराष्ट्राचे राज्यगीत" एक तालात गायले. हे गीत केवळ संगीत नसून, सामाजिक मूल्यांची व शूरवीरांची आठवण करून देणारे राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे.
शाळेचे हे सामूहिक व एकात्मिक वातावरण विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, शिस्त, आणि आदर्श नागरिकत्वाचे गुण बिंबवते, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.