बीटस्तरीय स्पर्धेत वेळू शाळेला घवघवीत यश. यशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव

Maharashtra varta




नसरापूर (प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषद, पुणे  यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव " भोर पंचायत समिती विकास गटातील गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे  यांच्या मार्गदर्शनाखाली नसरापूर बीट स्तरीय स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल वरवे येथे संपन्न झाले.




या बीटस्तरीय स्पर्धेत  शिवरे केंद्राने वीस प्रथम क्रमांक मिळवत त्यामध्ये वेळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने चमकदार कामगिरी करत सर्वात जास्त  8 स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत  8 गोल्ड मेडल मिळवत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे.त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे

या स्पर्धेमध्ये शिवरे केंद्रात वीस तर नसरापूर केंद्रात 14 तर मोहरी केंद्रात आठ ,जांभळी केंद्रात सहा असे प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल मिळवले आहे,यामधील
शिवरे केंद्राने 20  तर प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल मिळवलेले आहे त्यामध्ये वेळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आठ तर शिंदेवाडी शाळेने पाच, शिवरे शाळेने पाच व कुसगाव शाळेने एक, खोपी शाळेने एक असे प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळवत गोल्ड मिळवलेले आहे.


यामध्ये  शिवरे केंद्रातील वेळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वैयक्तिक स्पर्धेमध्ये धावणे मोठा गट मध्ये साक्षी नवनाथ शिंदे प्रथम क्रमांक तर बुद्धिबळ मध्ये शिवम अंकुश कोल्हे प्रथम,
 लांब उडी मध्ये शिवम कोल्हे प्रथम,
 उंच उडी लहान गट मध्ये स्वराज यादव प्रथम ,
गोळाफेक मोठा गट मध्ये शुभांगी  राठोड प्रथम ,तर या शाळेतील सांघिक स्पर्धेमध्ये प्रथम लोकनृत्यांमध्ये प्रथम लेझीम मध्ये ,छोट्या गटामध्ये प्रथम,
 लेझीम लहान गटामध्ये प्रथम, कबड्डी मोठा गट द्वितीय असे यश मिळवले आहे, मुख्याध्यापक वैशाली सूर्यवंशी तर लेझीम मार्गदर्शकआदर्श शिक्षिका रूपाली मुजुमले  वृंदावन मॅडम, लोकनृत्य मार्गदर्शन पठाण जमीन, लतीफ खान मॅडम, इतर सहकारी मलशेट्टी सर ,घोडे मॅडम सणस मॅडम, घुले मॅडम, निकम मॅडम ,वाघमारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी विस्तार अधिकारी राजेंद्र जाधव केंद्रप्रमुख संजय माने उपस्थित होते.

या स्पर्धेचे नियोजन समितीमध्ये संदीप दानवले सर ,पालकर सर मुख्याध्यापक वैशाली सूर्यवंशी,थोरात मॅडम व शिक्षक होते.
To Top