परभणी येथे संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन; खेड शिवापुर टोल नाका बंद.

Maharashtra varta




(न्यूज वार्ता मुख्य संपादक.)

परभणी येथे घडलेल्या संविधान विटंबनेच्या निषेधार्थ राज्यभरातील अनेक भीमसैनिकांनी परभणी गाठले. या घटनेच्या अनुषंगाने चाकण येथील एलएलबी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांनीही ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी परभणी येथे हजेरी लावली. मात्र, पोलीस प्रशासनाच्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिस कोठडीत त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज हवेली, भोर आणि वेल्हा तालुक्यातील आंबेडकरी संघटना व पक्षांच्या वतीने खेड शिवापुर टोल नाका बंद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष प्रवीण ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

यावेळी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये किशोर अमोलिक, विनोद गायकवाड, महेंद्र साळुंखे, सागर जगताप, अविनाश गायकवाड, आकाश ओव्हाळ, आकाश कांबळे, नवनाथ कदम, प्रदीप कांबळे, सुनील गायकवाड, स्वप्नील सावंत, दीपक गायकवाड, आकाश गायकवाड आणि इतर भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान निषेध व्यक्त करत संविधान रक्षणासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले.





To Top