चिखलगावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी ७५ लाख निधी मंजूर – संग्राम थोपटे

Maharashtra varta

 


भोर– भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील चिखलगाव येथे नूतन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून, या उपकेंद्राच्या बांधकामासाठी तब्बल ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपकेंद्रामुळे चिखलगाव पंचक्रोशीतील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळणार असल्याचे  मा.आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.  

ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीनंतर थोपटे यांनी आरोग्य विभाग, संबंधित अधिकारी, तसेच आरोग्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून आरोग्य उपकेंद्र मंजूर करून घेतले. या निधीमुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या सोडवल्या जातील.  


नव्या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना पुढील सुविधा मिळणार आहेत:  

- स्थानिक आजारांवर नियंत्रण  

- राष्ट्रीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी  

- महत्त्वपूर्ण आरोग्य आकडेवारी गोळा करणे  

- रेफरल व प्रयोगशाळेच्या सेवा उपलब्ध होणे  

- गंभीर आजारांपासून बचावासाठी उपचार  


ग्रामस्थांचा समाधानाचा सूर  

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे चिखलगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः एकनाथ गायकवाड आणि आनंदराव धोंडे-पाटील यांनी आमदार थोपटे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रयत्नांबद्दल आभार मानले.  

आता या उपकेंद्रामुळे चिखलगावसह परिसरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असून, ग्रामस्थांचा जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल.

जाहिरात क्रमांक:-



To Top