कामथडी (प्रतिनिधी) : विठ्ठल पवार सर
भारतीय सेनादलात 18 वर्ष उत्कृष्ट काम केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस सेवेत 24 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवत पोलीस प्रशासनात कामाच्या कार्याच्या माध्यमातून आदर्श निर्माण केलेला आहे ,महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल होऊन 24 वर्ष त्यांनी लोकसेवा करत कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांना न्याय मिळवून देणे व राजगड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणे या कामाचा गौरवच त्यांच्या सेवापूर्ती समारंभात होतोय असे प्रतिपादन राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले.
राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल महांगरे यांचा सेवानिवृत्त निमित्त गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता., याप्रसंगी पोलीस निरीक्षक गवळी बोलत होते ते पुढे म्हणाले की,पदाच्या माध्यमातून नव्हे तर कामाच्या माध्यमातून व्यक्तीची उंची वाढत असते.
राजगड पोलीस स्टेशन नसरापूर यांचे वतीने सेवापुर्तीनिमित्त राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल महांगरे यांचा सपत्नीक सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. पोलीस प्रशासन व खंडाळा तालुक्याच्या वतीने गुठाळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व वकील संघटना व सामाजिक संस्थेच्या वतीने आणि नातेवाईक मित्र परिवार यांनी त्यांचा सत्कार केला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश शिवतरे मा. उपअधीक्षक भुमिअभिलेख पुणे यांनी केले, खंडाळा तालुक्याचे उद्योजक दीपक जाधव , पोल्ट्री कन्सल्टंट डॉ.राकेश निंबाळकर पुरंदर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक आर आर पाटील तसेच निवृत्त मुख्याध्यापक गंगाराम पवार,शिवाजी मरळ यांची शुभेच्छा मनोगते झाली. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार सर यांनी केले
यावेळी प्रकाश शिवतरे मा.अधीक्षक भुमिअभिलेख पुणे , खंडाळा तालुक्याचे उद्योजक दीपक जाधव , पोल्ट्री कन्सल्टंट डॉ.राकेश निंबाळकर पुरंदर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक आर आर पाटील ,अरविंद महांगरे,बाळासाहेब इंगुळकर,डॉ.कदम, निवृत्त मुख्याध्यापक गंगाराम पवार, पोलीस महादेव कुतवळ,वकील शिवाजी मरळ, राजेंद्र खोपडे अडसूळ मॅडम ,छाया बांदल,नामदेव बांदल,पोलीस अजित माने,भागीरथी घुले ,व राजगड व भोर पोलीस स्टेशनचे व सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी ,पत्रकार व खंडाळा व पुरंदर तालुक्यातील नागरिक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते
राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल महांगरे" म्हणाले की,माझ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व वकील बंधू भगिनी व मित्र परिवार यांना माझा सप्रेम नमस्कार, आपल्या सर्वांचा निरोप घेताना मनात भावनांचा प्रचंड कल्लोळ उठला आहे. राजगड पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करताना आपण सर्वांनी जे अनमोल सहकार्य केले त्यातून उतराई होणे केवळ अशक्यच. या ठिकाणी मला नेमून दिलेले काम योग्य व अचूक करताना आपण सर्वांनी जी अनमोल सहकार्याची साथ दिलीत त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपणा सर्वांचा निरोप घेताना मन भरून आले आहे,मात्र आपल्याशी जोडले गेलेले नाते सदैव जपण्याचा मानस राहील.