मुख्य संपादक न्यूज वार्ता,
कामथडी (ता. भोर, जि. पुणे) येथील अक्षय राजेंद्र वाल्हेकर (वय 28, व्यवसाय शेती) यांच्या घराजवळ लावलेली चारचाकी गाडी (MH 12 VQ 9222) कोणी अज्ञाताने फोडल्याची घटना घडली आहे. अक्षय वाल्हेकर हे बाहेरगावी असताना ही घटना घडली.

गाडीच्या समोरच्या, साईडच्या आणि पाठीमागील काचा अज्ञात व्यक्तीने बांबूचा वापर करून फोडल्या असून, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे.
या संदर्भात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गु.र.नं. 561/24, भा.दं.वि. कलम 324 (5) अंतर्गत तपास सुरू आहे. प्रभारी अधिकारी राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस फौजदार चव्हाण आणि पोलीस अंमलदार कोल्हे तपास करीत आहेत.
सामाजिक निषेध:
अक्षय वाल्हेकर हे सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने ग्रामस्थ आणि त्यांच्या मित्रपरिवाराने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
All Right Reseved ©. 2022 कोकण न्यूज | Designed by Mb Creation & Adword ✆ 9029508907