शिव प्रहार प्रतिष्ठानचे संतोष मोहिते यांचा संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा●

Maharashtra varta



(मुख्य संपादक न्यूज वार्ता):-

भोर  विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेला विकास तसेच   आमदार संग्राम थोपटे यांचे विकासकामे  पाहून त्यांचा  100 टक्के विजय होणार  असल्याचे सांगत  आमदार संग्राम थोपटे यांना  शिव प्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी  पाठिंबा कापूरहोळ येथे दिला आहे .

कापूरहोळ येथील  आमदार संग्राम थोपटे यांचे प्रचार दौऱ्यात जाहीर पाठिंबा संतोष मोहिते यांनी संग्राम थोपटे यांना दिला आहे.श्यामसुंदर जायगुडे  यांच्या प्रयत्नातून संतोष मोहिते यांनी संग्राम थोपटे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. 

याप्रसंगी  राजगड कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपटराव सुके ,शेतकरी संघटनेचे नेते व प्रगतशील शेतकरी  शामसुंदर  जायगुडे व मा.उपसभापती रोहन बाठे,दत्तात्रय बाठे ,चंद्रकांत देवघरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भोर राजगड मुळशीचे  आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी संतोष मोहिते यांनी दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत व अभिनंदन केले.

To Top