●मुख्य संपादक न्यूज वार्ता●राम पाच काळे●
भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील कासुर्डी खे. बा .व ससेवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या गावांमध्ये विविध स्वरूपाची विकास कामे आपण राबवली. आपल्यामुळं सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना सुख, सुविधा आणि मदतीचा हात मिळाला पाहिजे हा एकच विचार घेऊन आपण आजपर्यंत काम करत आलो आहोत. म्हणूनच भोर-राजगड-मुळशीच्या मायबाप जनतेनं गेले तीन टर्म मला सेवा करण्याची संधी दिली. उर्वरित जी काही कामे असतील ती देखील पुढील काळात आपण मार्गी लावू. कोणत्याही लढाईत विजय शेवटी सत्याचा होतो. आपला मतदारसंघ हा शूरवीर मावळ्यांची भूमी आहे स्वाभिमानाच्या या लढाईत जनता माझ्या सोबत आहे हा विश्वास आहे.असे विचार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
कासुर्डी खे.बा व ससेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार संग्राम थोपटे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले व आमचे गावातील ग्रामस्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुम्हालाच मतदान करणार आहे असे नागरिकांनी या वेळेस संग्राम थोपटे यांना सांगितले.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.