मुख्य संपादक न्यूज वार्ता
कामथडी कडून करंदी कडे जाणाऱ्या रस्त्यावर चर खणून जमिनिअंतर्गत विद्युत केबलचे काम नसरापूर विद्युत कंपनी 【MSEB】 उपविभागाच्या माध्यमातून सुरू आहे ,यामुळे भविष्यात पावसाळ्यात करंदी तसेच कामथडी परिसरातल्या नागरिकांना याचा मोठा त्रास होणार आहे, पाणी जाण्यासाठी गटारे च्या बाजूकडे चर न खणता रस्ताच्या बाजूला चर खणला गेला असून उद्याच्या काळात रस्ता मोठ्या प्रमाणात खचण्याची शक्यता नाकारता येणार नाही, हे चालू असलेले काम चुकीचे आहे, याबाबत असे चुकीचे काम करण्याची परवानगी कशी दिली जाते,असा घणाघात आरोप करंदी खे .बा.चे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खाटपे यांनी सांगितले.
पुढे प्रदीप खाटपे यांनी बोलताना सांगितले की, करंदी कडून कामथडीकडे जाणाऱ्या डाव्या बाजूला विद्युत केबल टाकण्याचे काम सुरू आहे ,उजव्या बाजूला माती रस्त्यावरती टाकली आहे त्यामुळे वाहनांना नागरिकांना याचा त्रास होत आहे ,दोन ते तीन दुचाकी या मातीवरून घसरून पडले, त्यांना किरकोळ जखमा देखील झाल्या रस्त्याच्या उजव्या बाजूला देखील विद्युत केबलचे काम यापूर्वी केलेले आहे ,त्यामुळे दोन्ही बाजूला भविष्यात गटारे काढायचे झाल्यास खूप मोठी अडचण यामुळे निर्माण होणार आहे, त्यामुळे करंदीचे आम्ही सर्व ग्रामस्थ याबाबत आगामी काळात मोठे आंदोलन उभे करू असे यावेळेस प्रदीप खाटपे यांनी बोलताना सांगितले.