आगामी विकास कामांसाठी प्रयत्नशीलः संग्राम थोपटेंची नसरापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अभिवचन संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

Maharashtra varta



(न्यूज वार्ता) :-

 गावांमध्ये विविध स्वरूपाची विकास कामे आपण राबवली. आपल्यामुळं सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना सुख, सुविधा आणि मदतीचा हात मिळाला पाहिजे हा एकच विचार घेऊन आपण आजपर्यंत काम करत आलो आहोत. म्हणूनच भोर-राजगड-मुळशीच्या मायबाप जनतेनं गेले तीन टर्म मला सेवा करण्याची संधी दिली. उर्वरित जी काही कामे असतील ती देखील पुढील काळात आपण मार्गी लावू. कोणत्याही लढाईत विजय शेवटी सत्याचा होतो. आपला मतदारसंघ हा शूरवीर मावळ्यांची भूमी आहे स्वाभिमानाच्या या लढाईत जनता माझ्या सोबत आहे हा विश्वास आहे. त्यामुळं चिंता करण्याचं काही कारण नाही. असे विचार महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले. 



भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील वीरवाडी ,जांभळी ,दिडघर, निधान सांगवी ,नसरापूर कामथडी येथे आमदार संग्राम थोपटे  यांनी  ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन दौऱ्यास सुरुवात केली. संग्राम थोपटे यांच्या गाव भेट दौऱ्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून आला. महाविकास आघाडीचे उमेदवार

संग्राम थोपटे यांनी येथील नागरिकांशी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने संवाद साधला, केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच संग्राम थोपटे यांनी यावेळी नागरिकांसोबत मुक्त संवाद साधत त्यांच्या अडचणी देखील समजून घेतल्या. यावेळी नसरापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नसरापूर आणि आसपासच्या ठिकाणी विस्तारीकरणामुळे या ठिकाणी जागेची उपलब्धता ही कमी होत चाललेली आहे. या अगोदर केलेली अनेक विकास कामे माहिती पुस्तकाच्या माध्यमातून सांगितली आहे. प्रलंबित असलेली विकासकामे करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी थोपटे यांनी बोलताना दिली.



नसरापूर येथील अनेक नागरिकांनी  थोपटे यांना पाठिंबा दर्शवला असून या ठिकाणची आरोग्य व्यवस्था, इमारतीची प्रलंबित कामांसाठी सदैव प्रयत्नशील असणार असल्याचे त्यावेळी म्हणाले. 13 कोटी रुपयांची पाण्याची योजना सुरू करण्यात आली. टाकीची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून अधिक दाबाने पाणीपुरवठा गावातील नागरिकांना देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या कामासाठी निधी देण्यात आला. परंतु पावसामुळे रस्ता खचून गेला आहे. बनेश्वर येथील मुख्य रस्त्याचे काम करणे गरजेचे असुन बनेश्वर केळवडे रस्ताच्या डांबरीकरणाचे काम केले आहे. गावाला पर्याय रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणची बाजारपेठ टिकली आणि वाढली पाहिजे, असा प्रामाणिक हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. चेलाडी येथील पशुसंवर्धन विभागाच्या 40 गुंठे जागेत सुनील केदार हे मंत्री असताना ती जागा जिल्हा परिषदच्या नावावर वर्ग करण्यात आली असून त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रकारचे आरोग्य केंद्राची निर्मिती होणार असल्याची माहिती  संग्राम थोपटे यांनी दिली.


 यावेळी शरद पवार गट भोर तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल,  मा.उपसभापती मानसिंग धुमाळ, माजी सभापती लहूनाना शेलार, रोहन बाठे , शिवाजी कोंडे, नसरापूरचे उपसरपंच सुधीर वाल्हेकर, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक ज्ञानेश्वर झोरे, इरफान मुलाणी, गणेश दळवी, महेश दळवी, विशाल बंटी कोंडे ,विजय लालू कोंडे,शिवराज शेंडकर, गणेश जागडे, भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रणजित बोरगे, शंकर शेटे, माऊली पांगारे, सोमनाथ सोमाणी, निखिल डिंबळे, विशाल डिंबळे, निलेश भोरडे,   प्रशांत  जगताप ,दत्तात्रय वाल्हेकर,राहुल बोरगे याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.




To Top