सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा

Maharashtra varta

 सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा



(मुख्य संपादक न्यूज वार्ता )-आर पाचकाळे

भोर  विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेला विकास तसेच त्यांचा  आमदार संग्राम थोपटे यांचा जनसंपर्क पाहून त्यांचा  100 टक्के विजय होणार  असल्याचे सांगत  आमदार संग्राम थोपटे यांना आपला  जाहीर पाठिंबा  नसरापूर येथे दिला आहे .नसरापूर येथील  आमदार संग्राम थोपटे यांचे प्रचार सभेत जाहीर पाठिंबा जगताप यांनी संग्राम थोपटे यांना दिला आहे.

भोर विधानसभेतील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा उमेदवार संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा भोर राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे शिवराज शेंडकर,  विकास पासलकर, जितेंद्र साळुंखे ,राजेंद्र कडू, नानासाहेब राऊत, गणेश जागडे यांच्या प्रयत्नातून अनिल जगताप यांनी संग्राम थोपटे यांना आपला जाहीर पाठिंबा केला आहे.

सैनिक समाज पार्टी या पक्षाच्या वतीने भोर  विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार म्हणून जगताप हे जहाज या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत,  भोर विधानसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार  संग्राम  थोपटे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेदवार आहे.सैनिक समाज पार्टी उमेदवार म्हणून जगताप यांनी संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने  अनेकांना हा अनपेक्षित धक्का  आहे.

To Top