मुख्य संपादक न्यूज वार्ता
भोर विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी केलेल्या मतदान यंत्राचे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे मॉक पोल सुरू असताना अज्ञात व्यक्तीने चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात भोर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयटीआय बुधवारी दिनांक 13 सकाळी नऊ ते रात्री आठ या कालावधीमध्ये ही घटना घडली .
निवडणुकीच्या गोपनीयेतेचा भंग केल्याप्रकरणी भोर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नायब तहसीलदार अजिनाथ गाजरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे