ती बातमी पूर्णपणे खोटी; आमच्या रक्तातच काँग्रेस:- शैलेश सोनवणे.

Maharashtra varta



मुख्य वार्ता न्यूज वार्ता संपादक:-राम पाचकाळे

भोर विधानसभा मतदार संघात सोशल मीडियावर एक बातमी कम पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले . बातमी होती थोपटे यांच्या विरोधात भोर काँग्रेसमध्ये मतभेद अनेक कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बातमीने भोरमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवून दिली. या बातमीत आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या एकाधिकाशाहीला कार्यकर्ते कंटाळले असून, अनेकजण काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मा. जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, शैलेश सोनवणे हे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत, असा उल्लेख होता. या प्रकरणी काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रसारित करण्यात आलेली बातमी कम पोस्ट चुकीची असून, तसे काहीही झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच या प्रकरणी व्यक्तीगत बदनामी केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे देखील विठ्ठल  आवाळे आणि  शैलेश सोनवणे यांनी सांगितले.

कोणतीही बातमी देत असताना त्या बातमीत सत्याचा विचार केला जातो. जर सत्य असेल तरच बातमी प्रसारित करण्यात येते. मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.

 सोशल मीडियाच्या आधारावार बातम्यांचा सुळसुळाट पाहिला मिळत आहे. या बातमीने ती गोष्ट प्रकाशात आली आहे. यासंबंधीची बातमी पोस्टमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण या बातमीत नावे असणाऱ्यांनी दिल्याने अश्या खोट्या बातमीत प्रसारित करण्याचा डाव प्रकाशझोतात आला आहे. यामुळे बातमीचा विश्वासार्हता या बातमीने ढासळली असल्याचे म्हणावे लागत आहे.

या प्रकरणी बोलताना मा. जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे म्हणाले, माझी ओळख ही प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता आहे, हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. विरोधकांना त्यांचा पराभव दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न होता. आयात करून उमेदवारी दिलेली मंडळी आहेत, लोकांवर त्यांना लादले जात आहे. पुढारी जरी त्यांना गावांगावांत जाऊन फिरवत असले तरी लोकं त्यांना स्विकारत नसल्याने त्याची सल त्यांच्या मनात असल्याने गैरप्रकार करण्याचे ठरविले आहे. या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच बातमीत संग्राम थोपटे यांचे पुत्र पृथ्वीराज थोपटे हे कार्यकर्त्यांना अरेरावीची भाषा वापरत असल्याचे देखील खोटे असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचे नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी  आजपर्यंत काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. येत्या 18 नोव्हेंबर 2024 रोजी  तारखेला माजी  केंद्रीय कृषी मंत्री  शरद पवार आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे आणि आघाडीतील नेते यांची संग्राम थोपटे यांचे प्रचारार्थ भव्य सभा पार पडणार आहे. यामुळे त्याचा विरोधकांना  धक्का बसला आहे. सदर बातमीने व्यक्तीगत बदनामी झाली असल्याने याची दखल घेत अब्रुनुकसानीचा दावा 100 टक्के ठोकणार असल्याचे शैलेश सोनवणे म्हणाले.

To Top