विकासाचे धमक व नेतृत्व संग्राम थोपटे यांच्यातच आहे :-शरद पवार. हरीश्चंद्री येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांची सांगता विजय सभा संपन्न.

Maharashtra varta




(न्यूज वार्ता संपादक):-

भोर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम थोपटे यांनी केलेली विकास कामे उल्लेखनीय आहेत, गाव वाड्यावर  त्यांनी केलेली विकास कामे तेथील मूलभूत लोकांच्या गरजांना प्राधान्य देणारी आहेत, मतदारसंघाचा अभ्यास पूर्ण माहिती व मतदार संघात विकास कामांसाठी त्यांचा असणारा कर्तृत्वपणा हा खरोखरच वाखाण्याजोगा असून जनतेने अशा नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेच पाहिजे. मी संग्राम थोपटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, उद्याच्या भोर मतदार संघाच्या उज्वल भविष्य साठी संग्राम थोपटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून  राहिलेली विकास कामे पूर्ण होणार असून आपल्या राज्यातील विकासाचा एक नंबरचा मतदार संघ भोर राजगड  मुळशीचा असेल ,त्यासाठी संग्राम थोपटे यांना साथ द्या असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे


महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक पैलवान घडवणारा वस्ताद” स्वराज्यभूमी भोर-राजगडच्या मातीत २०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संग्रामदादा थोपटे यांच्या प्रचारार्थ,पद्मविभूषण मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा संपन्न हरीश्चंद्री-कापुरहोळ मैदान, पुणे-सातारा महामार्ग येथे सभा संपन्न झाली,त्याप्रसंगी शरद पवार बोलत होते.


बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भोर राजगड मुळशीतील एकच नाव ते म्हणजे संग्राम थोपटे आहे ,बऱ्याच वेळा अनेक जण म्हणतात की सकाळच्या सभेला गर्दी होत नसते, त्यासाठी सकाळची सभा घ्यायची नसते, मात्र सकाळची सभा आणि विजयाची सभा फक्त संग्राम थोपटेच घेऊ शकतात,  कारण जनतेची  तथा  मतदारांची प्रचंड मोठी ताकद  त्यांच्यामागे उभी आहे, अत्यंत हुशार अभ्यासू कार्यक्षम आणि जनतेच्या प्रश्नांवरती तत्पर असलेला महाराष्ट्रातला एक आमदार म्हणजे संग्राम थोपटे आहे. कुणापुढे झुकणार नाही, वाकणार नाही असा स्वाभिमानी बाणा अनंतराव थोपटे व संग्राम थोपटे यांच्यामध्ये आहे, त्यामुळे हा स्वाभिमानी आमदार कुणापुढे झुकणार नाही आपल्या मतदारांचा आणि मतदारसंघाचा विकासाच एकमेव लक्ष असलेले आमदार संग्राम थोपटे आहेत.महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये आल्यास आम्ही महागाई वाढू देणार नाही, शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमीभाव देणार आहे, तसेच रोजगार निर्मिती रस्ते, पाणी ,वीज इत्यादी मूलभूत सोयीसुविधा 100% देणार असे वचन सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. सध्या राज्यात अस्तित्वात असलेले महायुतीचे सरकार संविधान धोक्यात आणण्याचे काम करत आहे, त्यासाठी संविधान वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार टिकण्यासाठी महाविकास आघाडीला आपण भक्कमपणे साथ द्या, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर बहिणीला आम्ही तीन हजार रुपये देऊ तसेच शेतीमालाला  सरकारने लावलेला जीएसटी देखील शून्यावर  आणणार असल्याचे वचन सौ.सुप्रिया सुळे यांनी दिले आहे,


आमदार संग्राम थोपटे यांनी आपल्या भाषणात म्हणाले कीइथला मतदार मतदानाच्या रूपाने अजितदादा पवार यांना पाणी पाजणार आहे ,राजगड कारखान्याला  मंजूर झालेले कर्ज अजितदादा पवार यांनी नामंजूर करून इथला मजूर शेतकरी कामगार वर्गाला देशोधडी लावण्याचे कृत्य केलेले आहे , काहीजण अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमाला भोर तालुक्यातील महायुतीचे   कार्यकर्ते  व पदाधिकारी चिठ्ठ्या पुरवत होते मात्र ते तेवढ्या पुरते आता मर्यादित राहिलेले आहेत ज्यांचे बोट धरून तुम्ही राजकारणात आले ,त्या शरद पवार साहेबांना व सुप्रिया सुळे यांची साथ सोडून तुम्ही सवता सुभा उभा केला, म्हणूनच जनतेने लोकसभेला तुम्हाला नाकारले, त्यामुळे विधानसभेला देखील जनता तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही, भोर विधानसभा मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी मला साथ द्या, मी मतदार संघाचा  राहिलेली महत्वाची विकास कामे  येत्या पाच वर्षात करूनच दाखवीन, त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीमागे ठामपणे उभे रहा असे आवाहन केले.


भोर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली शिंदे म्हणाले की शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे  यांच्या पाठीत  शंकर मांडेकर  व कुलदीप कोंडे यांनी खंजीर खुपसून गद्दारी केली आहे, त्यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे .त्यामुळे मतदार त्यांना कधीही स्वीकारणार नाही,

याप्रसंगी माजी खासदार अशोक अण्णा मोहोळ यांचे व पदाधिकाऱ्यांचे मनोगत संपन्न झाले.

या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार ,बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे ,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, मा. खासदार नानासाहेब नवले, मा.खासदार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक अण्णा मोहोळ, महाविकास आघाडीचे तिन्ही तालुक्याचे प्रचार प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग बाबा धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्र बांदल, भोर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली शिंदे ,पश्चिम महाराष्ट्राचे विभाग अध्यक्ष हनुमंत कंक, भोर तालुका पूर्व भागाचे शिवसेनेचे अध्यक्ष शरद जाधव, भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे,काँग्रेस महिला अध्यक्ष  गीतांजली शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा विद्या यादव, भोर तालुका शिवसेना महिला संघटिका निशा सपकाळ तसेच भोर राजगड मुळशीतील युवा सेनेचे व  काँग्रेस पक्षाचे आणि  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी  तसेच राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष रेणुसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवती अध्यक्ष दुर्गा चोरगे ,राजगड तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रमोद लोहकरे, महिला अध्यक्षा तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी भोर राजगड तालुक्यातील मतदारांची अलोट गर्दी व प्रचंड जनसमुदाय सांगता सभेला उपस्थित होता.

या कार्यक्रमादरम्यान संग्राम थोपटे यांना रिंग रोड विरोधी कृती समिती ,बळीराजा शेतकरी संघटना, जय शिवराय प्रतिष्ठान व शिव प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे.

To Top