न्यूज वार्ता मुख्य संपादक:-
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक राजगड तालुक्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आमदार संग्राम थोपटे यांनी केले नाही, वेल्हा मधील तरुण व नागरिक पुण्यामध्ये स्थलांतर का होत आहे ,वेल्ह्यात गुन्हेगारी का वाढलेली आहे, वेल्ह्यात शेतकरी आपल्या स्वतःच्या जमिनी का विकत आहेत ?येथे रोजगार नाही? इथल्या मुलांचे लग्न ठरत नाही? इथली शिक्षण व्यवस्था सोयी सुविधा व्यवस्थित नाही ?सईबाईंच्या स्मृतीस्थळाचा निधी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून आम्ही मंजूर केला, त्यानंतर तुम्ही त्याचे श्रेय घेता. राजगड कारखान्यावर कोटी रुपयांचे कर्ज आहे, यामुळेच संग्राम थोपटे कार्यसम्राट नाही तर कर्ज सम्राट आहेत तसेच संजय राऊत म्हणाले होते की मी कधीही आमची शिवसेना काँग्रेसकडे असणार नाही मात्र आज तुम्ही मुळशी तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवाराच्या प्रचाराला येत आहे हीच का तुमची शिवसेना असा घनाघात भोर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी केला आहे.
अपक्ष उमेदवार कुलदीप सुदाम कोंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा ! वेल्हे 203 भोर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कुलदीप सुदाम कोंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा व टू व्हीलर रॅली, वेल्हे येथे संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते , ते पुढे म्हणाले की,मला अनेकांच्या निवडणुकीच्या कोटीमध्ये रुपयांच्या ऑफर आल्या होत्या मात्र त्या ऑफर मी स्वीकारलेल्या नाहीत मी इथल्या जनतेसाठी तरुणांसाठी वेल्हे तालुक्याच्या विकासासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहे,
ते पुढे म्हणाले की सुप्रियाताई सुळे तुम्ही निवडून आणण्याची व महाविकास आघाडीचे उमेदवार हे आहेत, ही भाषा इथे करू नका, तुम्ही इथल्या भोर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे बोला, मात्र तुम्ही विकास सोडून भलतेच बोलतात हे मात्र चालणार नाही. राजगड तालुका विकासापासून वंचित ठेवल्याचा आरोप कुलदीप कोंडे यांनी आमदार संग्राम थोपटे यांचे नाव न घेता त्यांच्या वरती हा आरोप अप्रत्यक्षपणे केला आहे याप्रसंगी राजगड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी दत्तात्रय देशमाने यांनी मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाला राजगड तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.