आमदार संग्राम थोपटे यांना या निवडणुकीत कठीण काहीच दिसत नाही.

Maharashtra varta





पुणे (प्रतिनिधी)●मुख्य संपादक न्यूज वार्ता●

लोकसभेला सुप्रियाताई सुळे जिंकल्या, त्यामागे या भोर मतदारसंघाचा फार मोठा वाटा आहे .संग्राम थोपटे यांना निवडणुकीमध्ये कठीण काही दिसत नाही, कारण त्यांना काहीच कठीण नसतं .काही  गद्दारी करून गद्दाराच्या गटात गेले, गद्दार जरी गेला असला तरी सगळी शिवसेना आहे, तिथेच आहे. शिवसेना संग्राम थोपटेंच्या मागे भक्कमपणे उभी राहील, ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आहे .गुजरात यांचे  कट कारस्थान उधळून लावण्यासाठी ही निवडणूक आहे हे सर्व मतदारांनी लक्षात ठेवावे, फक्त संग्राम थोपटे निवडणुकीला उभे नाही तर महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्र संग्राम थोपटेंसारखे महाराष्ट्राचे स्वाभिमान आणि निष्ठावान आमदार आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहेत .सरकार फक्त बदलायचं नाही तर आपल्याला उचलून फेकायचा आहे. मोदी आणि शहा दोन दिवसापासून महाराष्ट्रातून गायब झाले आहेत .अजित पवारांना त्यांचे सगळे उमेदवार स्वतः सारखे वाटतात ,त्यांना दुसरा उमेदवार इथे भेटला नाही का? असा खडा सवाल शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे .

 

कासार आंबोली तालुका मुळशी महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचाराची सांगता सभेच्या  निष्ठावंतांच्या जाहीर सभेत संजय राऊत बोलत होते.ते पुढे म्हणाले की,संग्राम थोपटे या अभूतपूर्व विजयानंतर  संग्राम थोपटे हे सरकारच्या गाडीमध्ये दिसतील.

महाविकास आघाडीचे भोर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संग्राम थोपटे म्हणाले की, सातत्याने मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरतीच निवडणूक लढलो आहे, मी निष्ठावंत आहे, मी कसले आमिषाला प्रलोभनाला पदाला बळी पडलो नाही ,त्यासाठी पक्ष सोडला नाही. मी कधीही प्रांतिक वाद केला नाही, विकास कामांच्या जोरावर जनतेमध्ये जात आहे, जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, मी ही निवडणूक लोक मताच्या जोरावरती जिंकणारच आहे असा आशावाद संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.

हरिचंद्री येथील शरदचंद्रजी पवार यांची झालेली संग्राम थोपटे यांच्यासाठीचे सभा व दुसरी मुळशी तालुक्यात झालेली शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सभेमुळे भोर विधानसभा मतदारसंघात थोपटेमय वातावरण झाल्याचे या माध्यमातून पाहायला मिळाले.

याप्रसंगी मुळशी तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top