आमदार संग्राम थोपटे यांचा हायवे पट्ट्यातील व पूर्व भागातील दौरा
न्यूज वार्ता संपादक
भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्याच्या हायवे पट्ट्यातील व पूर्व भागातील काळेवाडी, केंजळ, किकवी, दिवळे, कापूरव्होळ, निगडे, धांगवडी, मोरवाडी, वागजवाडी, सारोळे, सावरदरे, पांडे, राजापूर, भांबवडे, न्हावी, पेंजळवाडी, गुणंद, वाठार हिंगे, टापरेवाडी, भोंगवली गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.दौऱ्यात नागरिकांची मोठ्या संख्येने गावोगावी उपस्थिती दिसली.
यावेळी मानसिंगबाबा धुमाळ, रविंद्र बांदल, माऊली शिंदे, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, महेश टापरे, के.डी.भाऊ सोनवणे, पोपटराव सुके, रोहन बाठे, शरद जाधव, आदित्य बोरगे, आदित्य शिंदे, माऊली पांगारे, भरत बोबडे, विद्याताई यादव, निशाताई सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे म्हणाले या भागातील मुख्यत: वीर प्रकल्पग्रस्त बाधित गावांना १८ नागरी सुविधा अंतर्गत कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून प्रत्येक गावातील विकास कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर सारोळा - वीर - न्हावी रस्ता करणे ५ कोटी, इंगवली -काळेवाडी - किकवी -बांदलवाडी रस्ता १ कोटी ९० लक्ष, भोंगवली फाटा - माहूर परिंचे रस्ता ८ कोटी, व भोंगवली -माहूरखिंड - परिंचे रस्ता ४ कोटी ३० लक्ष, शिवरे जोड रस्ता १ कोटी, किकवी सावरदरे रस्ता ३ कोटी ३५ लक्ष, कुसगांव खोपी कांजळे साळवडे रस्ता करणे व पूल बांधणे १३ कोटी निधी उपलब्ध केला. त्याबरोबर PMRDA अंतर्गत रस्ते व अनेक लाभार्थीना घरकुले अनुदान मिळवून देण्याचे काम करता आले.)
आमदार स्थानिक निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, २५१५, ३०५४, ५०५४, साकाव कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती, पाणी पुरवठा योजना अंतर्गत निधी उपलब्ध करून अनेत कामे मार्गी लावण्यात आली त्यामुळे केलेल्या विकास कामांच्या जोरावर व या भागातील सर्व सामान्य मतदार, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पाठबळ आणि माझ्यावर असलेले प्रेम याला कुठेही तडा जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.