भोर विधानसभेमध्ये शिवसेना धनुष्यबाण फॅक्टर महत्त्वाचा ठरणार:-दशरथ जाधव

Maharashtra varta

 भोर विधानसभेमध्ये शिवसेना धनुष्यबाण फॅक्टर महत्त्वाचा ठरणार:-दशरथ जाधव.



न्यूज वार्ता संपादक:-आर पाचकाळे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसामान्य व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास करणारे हे  पहिले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या भोर तालुक्यामध्ये विकासाचे अनेक कामे झालेली आहेत इथला शिवसैनिक  हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे व  एकनाथ  शिंदे यांच्या विचारांचा आहे, त्यामुळे भोर तालुक्यातील कडवट  व  निष्ठावंत शिवसैनिकांची भूमिका भोर विधानसभेमध्ये शिवसेना  फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे.असे मत शिवसेना भोर तालुका अध्यक्ष दशरथ जाधव यांनी व्यक्त केले.


शिवसेना भोर तालुका आयोजित 203 भोर विधानसभा आढावा  पदाधिकारी बैठक शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता गोवर्धन मंगल कार्यालय नेकलेस पॉईंट शेजारी संगमनेर माळवाडी ता. भोर येथे संपन्न झाली, या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिवसेना महिला प्रमुख कांताताई पांढरे भोर विधानसभा प्रमुख गणेश मसुरकर, शिवसेना महिला तालुकाप्रमुख उज्वला पांगारे, शिवसेना मागासवर्गीय आघाडी जिल्हाप्रमुख शिवाजी अवसरे, भोर तालुका शिवसेना संघटक राहुल माने ,शिवसेना उपतालुकाप्रमुख केतन देवकर ,युवासेना उप तालुकाप्रमुख अक्षय सनस ,शिवसेना उप तालुकाप्रमुख सुदर्शन काटकर, कामगार सेना भोर तालुका प्रमुख ओंकार तांदळे, शिवसेना उप तालुकाप्रमुख आदित्य तीकोळे, युवा सेना समन्वयक भोर राजेंद्र पवार, शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत शेलार ,युवा सेना विभाग प्रमुख विशाल लेकावळे, शिवसेना विभाग प्रमुख सुनील मळेकर ,विद्यार्थी सेना उप तालुका प्रमुख विशाल पवार ,युवासेना विभाग प्रवीण गाडे, शिवसेना विभाग प्रमुख विकास वाटकर शिवसेना विभाग प्रमुख संकेत खाडे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना भोर तालुका अध्यक्ष दशरथ जाधव यांनी केले

To Top