मतदानानंतर 21 तारखेला कर्मचाऱ्यांना सुट्टी द्या.

Maharashtra varta

मतदानानंतर 21 तारखेला  कर्मचाऱ्यांना सुट्टी द्या.... पुणे जिल्हा शिक्षक समितीची  उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  मिनल  विवेक कळसकर मॅडम यांच्याकडे  निवेदनाद्वारे  मागणी,




न्यूज वार्ता संपादक:-टी. यादव●

🎯आज पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष आणि जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक *श्री बाळासाहेब लांघी सर व जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष *श्री नामदेव कोकाटे सर* यांनी  उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  मा *मीनल विवेक कळसकर मॅडम* यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या निवडणुकीच्या प्रश्नांच्या संदर्भात  चर्चा केली.


🎯१)  मतदान झाल्यावर मशीन जमा केल्यानंतर घरी यायला पहाट होते.त्यामुळे दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जाताना खूप कसरत करावी लागते,त्यासाठी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी  २१ तारखेला सुट्टी मिळावी ही विनंती केली. मॅडमने सांगितले की निश्चितपणे खूप चांगली तुमची मागणी आहे. तुमच्या मागणीचा निश्चितपणे विचार केला जाईल. आणि सुट्टी देण्याचा प्रयत्न करू. 


🎯२)त्यानंतर  समितीच्या वतीने आम्ही दुसरी मागणी केली की पुणे जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघामध्ये कर्मचाऱ्यांना भत्ता समान मिळाला पाहिजे त्याविषयी मॅडमनी सांगितले की निश्चितपणे या वेळेसच समान भत्ता दिला जाईल.


🎯३)कर्मचाऱ्यांना ने- आण करण्यासाठी एस टी.  बस ची व्यवस्था करावी,याविषयी निवेदन दिले मॅडमने सांगितले की यावेळेस आपण सर्व विधानसभा मतदारसंघात बसची व्यवस्था केलेली आहे. आणि तसेच त्या ठिकाणी मशीन जमा केल्यानंतर भोजन व्यवस्था सुद्धा करण्याचे आम्ही सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे.


🎯४) लोकसभेचा अनुभव मॅडमला सांगितला की अनेक ठिकाणी महिलांना राहण्याची व्यवस्था झाली नाही.  काही ठिकाणी जेवण, पाणी, व आंघोळीसाठी पाणी मिळाले नाही. या गैरसोयी मॅडमच्या निदर्शनात आणून दिल्या मॅडम बोलल्या यावेळी आपण सर्व यंत्रणांना याची कल्पना दिलेली आहे. कुठेही गैरसोय होणार नाही. गैरसोय झाली तर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क करा.पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती


🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

To Top