मुळशी प्रचार दौऱ्यात आमदार संग्राम थोपटे यांचे नागरिकांनी केले उत्स्फूर्त स्वागत.
न्यूज वार्ता संपादक ( प्रतिनिधी):-राम पाचकाळे
भोर विधानसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील रिहे व वाड्या, घोटावडे गावठाण व वाड्या आणि मुलखेड येथे आमदार संग्राम थोपटे यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी आपुलकीने केलेल्या सत्काराचा आमदार संग्राम थोपटे स्वीकार केला. या दोन्ही गावांमध्ये विविध स्वरूपाची विकासात्मक कामे आमदार थोपटे यांचे माध्यमातून झाली आहेत.याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे. उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
रिहे आणि घोटावडे ही दोन्ही मुळशी तालुक्यातील महत्वाची गावे आहेत. घोटावडे गाव हे तर बारा वाड्या आणि मोठी बाजारपेठ असलेलं गाव आहे. या दोन्ही गावात आमदार संग्राम थोपटे यांचे माध्यमातून
कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहे. रिहे इथे शेळकेवाडी ते खांबोली रस्ता, घोटावडे-रिहे-आंधळे येथील नाल्यावरील जोडणारा पुल ही मोठी कामे थोपटे यांनी केली. त्यामुळे रिहे येथे विकासकामाच्या मुद्द्यावर आपण याठिकाणी जनते पुढे आलो आहोत.
असे त्यांनी सांगितले. थोपटे पुढे म्हणाले की,
घोटावडे येथे येथील विविध स्वरूपाची विकासात्मक कामे आपण केली. यामध्ये विविध रस्ते, घोटावडे मंडल अधिकारी कार्यालय उभारणी आदी कामे आहेत. इथून पुढच्या काळातील कामे देखील अग्रक्रमाने करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठ्ठं गाव असून देखील एकमताने महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिलेले गाव आहे. सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर आपण निष्ठेची लढाई नक्की जिंकू असा विश्वास आहे.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.