भोर ,राजगड मुळशीतील पक्ष संघटना वाढवण्यासाठी शिवसैनिकांना विधानसभा निवडणुकीत सन्मानाची वागणूक मिळावी आणि भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,भोर नगरपालिका,बाजार समिती व इतर निवडणुक
संपादक न्यूज वार्ता
सचिन आहिर संपर्क प्रमुख ,पुणे जिल्हा भोर विधानसभा निवडणूक आणि महविकास आघाडी म्हणून भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात आदित्य बोरगे युवा जिल्हा अधिकारी,पुणे यांनी लेखी निवेदन देऊन सांगितले आहे.
वरील विषयास अनुसरून मी आपणास विनंती करतो की, लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्याकडून आणि मातोश्री वरून आलेल्या आदेशाप्रमाणे भोर तालुक्यातील आणि विधानसभा मतदार संघातील प्रत्येक शिवसैनिकांनी आणि युवसैनिकांनी महाविकास आघाडी म्हणून खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचे प्रामाणिक आणि निष्ठेने काम केले आहे. विजयात जिवाचं रान करून सिंहाचा वाटा उचलला आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मातोश्रीच्या आदेशाप्रमाणे आपला निष्ठावान शिवसैनिक प्रामाणिक काम करेल यात शंका नाही. परंतु भोर राजगड मुळशीतील पक्ष संघटना वाढवण्यासाठी शिवसैनिकांना विधानसभा निवडणुकीत सन्मानाची वागणूक मिळावी आणि भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,भोर नगरपालिका,बाजार समिती व इतर निवडणुकीमध्ये आपला योग्य विचार होऊन सन्मानजनक वाटा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करावेत ही विनंती.यामुळे पक्ष संघटना वाढवण्यासाठी व बळकट होण्यासाठी मदत होईल असे मला एक शिवसैनिक म्हणुन वाटते.असे आदित्य बोरगे युवा जिल्हा अधिकारी,पुणे यांनी सांगितले आहे.