20 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर
सामान्य प्रशासन विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑक्टोबर, २०२४.अधिसूचना क्रमांक सार्वसु-१०२४/प्र.क्र.१३६ /जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१चा २६) च्या कलम २५ नुसार व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-जेबुडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे. २. मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे/मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.