टायगर ग्रुपचे अध्यक्ष मा. पै. डॉ. तानाजी जाधव यांचा वाढदिवस सतीश पासलकर यांच्या तर्फे नागरिकांना दिवाळी फराळ, फळे वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन.
(न्यूज वार्ता संपादक):-आर पाचकाळे
भोर दि. 08 नोव्हेंबर: टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै. डॉ. तानाजीजाधव यांच्या तारखेच्या वाढदिवसानिमित्त नसरापूर, भोर याठिकाणी आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील गोरगरिबांची दिवाळी कशी गोड होईल असे पाहणारे टायगर ग्रुपचे सतीश पासलकर यांनी याठिकाणी जाऊन या नागरिकांना दिवाळी फराळ आणि केळीचे वाटप करण्यात आले. दरवर्षी टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै. डॉ. तानाजी जाधव यांच्या वाढदिवशी रक्तदान आयोजित केले जाते परंतु या वर्षी दीपावली आलेने नवीन असे काहीतरी करावे 'संकल्प नवा ध्यास नवा' असा प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी म्हणूनच एक छोटासा प्रयल म्हणून वाढदिवसाचे निमित्त साधून है एक उपक्रम राबविण्यात आला. सतीश पासलकर भोर तालुका व टायगर ग्रुप मित्रपरिवार है टायगर ग्रुप च्या माध्यमातून काम करत आहेत कार्यक्रमाचे आयोजन भोर येथील नसरापूर मध्ये करण्यात आले. यावेळी टायगर ग्रुप भोर तालुका सतीश पासलकर, दीपक कोंडे, अमोल पासलकर, संदीप भुरुक, प्रशांत कोंडे, सागर काकडे आणि श्रीधर वासमाने उपस्थित होते.