राजगड तालुक्यातील जनता प्रलोभनाला बळी पडणार नाही:-आमदार संग्राम थोपटे.

Maharashtra varta

 राजगड तालुक्यातील जनता प्रलोभनाला बळी पडणार नाही:-आमदार संग्राम थोपटे.






संपादक न्यूज वार्ता (प्रतिनिधी):-

भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड (वेल्हा)तालुक्यातील विहीर, अंत्रोली, निवी, घिसर, कोदापूर, धानेप, कोंढावळे, हिरपोडी, पाबे, दापोडे, लाशिरगाव, मालवली, विंझर, खांबवडी या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.

 याठिकाणी बोलताना ते म्हणाले की या भागातील नागरिकांना अनेकांनी प्रलोभने दाखवली पण या भागातील स्वाभिमानी जनता अनंतराव थोपटे साहेबांपासून सदैव आपल्या सोबत आहे याचा अभिमान वाटतो.!

       त्यामुळे सर्व राजगड तालुक्यातील जनता मतदार बंधू भगिनी या भागातून अधीकचे मतदानरूपी आशिर्वाद देतील या भागातील धानेप फाटा ते विहीर रस्ता २ कोटी २५ लक्ष, लाशिरगांव ते पाबे फाटा ४ कोटी, लाशिरगांव येथे साकव ६० लक्ष, PMRDA अंतर्गत लाशिरगांव जोड रस्ता करणे १ कोटी २० लक्ष, दापोडे रस्ता ६७ लक्ष, खांबवडी जोडरस्ता करणे ३० लक्ष, अंत्रोली घिसर चांदर माणगाव या रस्त्यासाठी ३० लक्ष निधी उपलब्ध सदरील महत्वाची विकास कामे मार्गी लावण्यात आली. 
    आमदार स्थानिक निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, २५१५, ३०५४, ५०५४, साकव कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी उपलब्ध करून नळपाणी पुरवठा योजना, समाजमंदिर, अंतर्गत रस्ते, शाळा वर्गखोली, सभामंडप, स्मशानभूमी शेड बांधणे अशी 
अनेक कामे गावागावातील वाडी वस्तीमध्ये निधी उपलब्ध करून मार्गी लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी संतोष रेणुसे, माऊली शिंदे, नानासो राऊत, दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, दिनकरआण्णा सरपाले, शंकर आण्णा ठाकर, सीमाताई राऊत, संदीप नागीने, नारायण कडू, बाळासाहेब देशपांडे, गणपत आप्पा देवगिरीकर, शैलेश वालगुडे, रामभाऊ रेणुसे, भगवान बांदल, शोभाताई जाधव, दुर्गाताई चोरगे, छायाताई काळे, अमोल पडवळ, प्रमोद लोहकरे, दिपक दामगुडे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, प्रदीप मरळ, हेमंत जाधव, संतोष मोरे, शिवाजी चोरघे, संतोष लिम्हण, अमोल गायकवाड, आकाश वाडघरे, निलेश पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
To Top