काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश!
न्यूज वार्ता संपादक:-
भोर विधानसभा मतदारसंघातील राजगड तालुक्यातील कोंढवळे गावातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रल्हाद (भाऊ) मरळ, श्याम मरळ, राजेंद्र दत्तू मरळ, प्रशांत राजेंद्र मरळ, राजू मरळ, विजय भगवान मरळ, भिमाजी पासलकर, यश मोरे, संपत गणपत पासलकर, विजय नभू मरळ, विजय गणपत भूरुक, राजेंद्र गणपत भूरुक, राजेंद्र जगन्नाथ मरळ, अनिकेत जयसिंग चारे, शिवाजी रघुनाथ मरळ, एकनाथ रघुनाथ मरळ आदी कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासोबत अनेक लोक जोडले जात आहेत. लोकांची मिळत असलेली साथ ही आपण केलेल्या धकाकेबाज विकास कामांना असून, जनतेचा मिळत असलेला विश्वास हा काम करण्यासाठी अधिक सकारात्मक ऊर्जा देत आहे. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.