अपक्षांनी घेरल आणि मांडेकरांनी हेरल. भोर विधानसभा मतदार संघावर युतीची सत्ता. शंकर मांडेकरांनी इतिहास घडवला. भोर शहरात मांडेकरांची राष्ट्रवादीने काढली विजयी मिरवणुक

Maharashtra varta



(न्यूज वार्ता मुख्य संपादक):

भोर विधानसभेच्या झालेल्या चौरंगी निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादी ( अजित पवार गटाचे) उमेदवार शंकर मांडेकर यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस चे उमेदवार संग्राम थोपटे यांचा  20 हजार 108 मतांनी पराभव करुन भोर विधानसभा मतदार संघात इतिहास  घडवला आहे.

या निवडणुकीत शंकर मांडेकर यांनी सुरुवातीपासूनच  मतांची मोठीच  आघाडी घेतली होती.24 मतमोजणी फेऱ्यात शंकर  मांडेकर यांनी ५३ हजार मतापर्यंत आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीत एकूण 2 लाख 91 हजार 704 मतांपैकी 1लाख 26 हजार 252 मते मिळवली तर संग्राम थोपटे यांना 1 लाख 6 हजार 347 अधिक पोस्टली ४५० मते मिळाल्याने भोरचे निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.विकास खरात यांनी शंकर मांडेकर यांना विजयी घोषित केले.

या वेळी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

विजयी उमेदवार आमदार शंकर मांडेकर यांची शेटेवाडी चौपाटी येथील छञपती शिवरायांचे अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन भोर शहरात विजयी मिरवणुक काढण्यात आली.

या विजयाचे सारे श्रेय शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे व  भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार किरण दगडे यांनाच जात असुन त्यांनी मिळवलेली 28948 + 25549 या निवडणुक निकालात निर्णायक ठरली असुन महाविकास आघाडीला "अपक्षांनी घेरलं आणि नेमकं तेच शंकर मांडेकरांनी हेरल" अशा विविध चर्चा मतदारांमध्ये रंगत असल्याचे दिसून येत आहे.

या विजयाचे खरे श्रेय मुळशीकरांना जात असुन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांचे काम केले नसल्याचेही छुप्या व बारीक आवाजात बोलले जात आहे.तर काही का होईना ? अत्यंत थोड्या प्रमाणात लाडकी बहिण योजना आणि देवयाञा यांचाही फटका महाविकास आघाडीला बसला असल्याचे बोलले जात असल्याचे दिसून येत आहे.


विजयी उमेदवार शंकर मांडेकर यांनी बोलताना सांगितले, माझ्या या विजयामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे .त्यांनी रात्रंदिवस माझ्यासाठी मेहनत घेतलेली आहे. की इथले राजगड सहकारी साखर कारखाना तसेच येथील एमआयडीसी बाबत व  मूलभूत सुविधांबाबत विशेष प्रयत्न आगामी काळात करणार असल्याचे यावेळी सांगितले






To Top