मुख्य संपादक न्यूज वार्ता:-
भोर राजगड मुळशीत गेल्या पंधरा वर्षात मतदारसंघात मोठ्या विकासकामांमुळे आता मोठ्या मताधिक्याने चौकार ठोकणार, असा दावा भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांनी केला आहे. तर प्रथमच मुळशीला संधी मिळाल्यामुळे मतदारांनी निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे यावेळी मुळशीचा आमदार म्हणून निवडून येणार, असा विश्वास महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केला असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भोर मतदारसंघात बुधवारी ६७.७९ टक्के मतदान झाले. एकूण ४ लाख ३० हजार २७८ पैकी २ लाख ९१ हजार ७०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानुसार भोर तालुका ६६ हजार ५ पुरूष, ५९ हजार १६९ महिला, राजगड २१ हजार ६२२ पुरुष, १८ हजार २९८ महिला, मुळशी ६९ हजार २८५ पुरूष, ५७ हजार ३२२ महिला मतदारांनी मतदान केले.
भोर ७३.५४. राजगड ७३.८६, मुळशी ६१.४६ टक्के मतदान झाले. मुळशीपेक्षा भोर, वेल्हे तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे,20 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी दोन वाजनेच्या आत दुपारपर्यंत अधिक स्पष्ट होईल.
थोपटे, मांडेकर व अपक्ष किरण दगडे, कुलदीप कोडे अशी चौरंगी लढत शेवटच्या टप्प्यात काटे की टक्कर झाल्याचे चित्र दिसले. अजित पवार यांनी भोर व मुळशीमध्ये जाहीर सभेतून थोपटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर केलेली घणाघाती टीका व मतदार संघ भकास केल्याचा आरोप, त्याला शरद पवार यांनी भोरच्या सभेत, तर संजय राऊत यांनी मुळशीच्या सभेत दिलेले प्रत्युत्तर, तसेच दगडे व कोडे यांनीही जाहीर सभांमधून थोपटेंवर गंभीर आरोप केले होते. यामुळे मतदार संघातील राजकीय वातावरण अधिक ढवळून निघाले होते. त्यामुळे सुरवातीला चौरंगी लढत चुरशीने होईल, असे दिसणारे चित्र शेवटच्या टप्प्यात थोपटे व मांडेकर यांच्या भोवती केंद्रीत झाले.
मांडेकर स्थानिक उमेदवार हा मुद्दा अजित पवारांसह मुळशीकरांनी जोरदार उत्तरोत्तर हायजॅक केला, त्यामुळे उत्तरोत्तर मतदानानंतर दोघांनी थोपटे व मांडेकर यांनी आपणच बहुमताने विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. मांडेकर आमदार झाल्याचे बॅनर पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी हद्दीत भाजपाच्या उत्साही कार्यकर्त्याने लावला असून, शुभेच्छा दिल्या आहेत. तर गावागावात कार्यकत्यांमध्ये आणि समाजमाध्यमातून उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार झाल्याचे भाकीत केले केले. ही लढाई कोण जिंकणार याचा फैसला उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे दिसून येत आहे.