भोर विधानसभा मतदारसंघात 68 टक्के मतदान.

Maharashtra varta



(न्यूज वार्ता):-मुख्य संपादक

भोर विधानसभा  मतदारसंघासाठी एकूण 4 लाख 30 हजार 278. मतदारांपैकी एकूण 2 लाख 92 हजार 649 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.भोर विधानसभा मतदारसंघात झालेले एकूण  मतदानाची टक्केवारीमध्ये हे प्रमाण 68.01% टक्के आहे. मागील 2019 च्या भोर विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून 64.09% टक्के मतदान झाले होते. यंदा यामध्ये 5 टक्के वाढ झालेली दिसत आहे.

या निवडणुकीत  टक्केवारीत  4 % मतदानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  एकंदर या मतदानाच्या आकडेवारीवरून भोर विधानसभा मतदारसंघात कौल कोणाच्या बाजूने राहणार हे 23 नोव्हेंबर 2024 रोजी उघड होणार आहे.

चौरंगी लढतीच्या भोर राजगड मुळशी मतदारसंघातील मुळशी मधील सरासरी 60% पेक्षा अधिक ठासून मतदान झाले असून आता निकाल देखील घासून लागणार असल्याचे चर्चा भोर विधानसभा मतदारसंघात आता चांगलीच रंगू लागलेले आहे.

लोकसभा निवडणुकीला घसरलेला मतांचा टक्का आणि विधानसभा निवडणुकीत उंचावलेला आपल्याला याप्रसंगी पाहायला मिळतोय, भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध गावांमध्ये उशिरापर्यंत मतदाराच्या रांगा दिसून आल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर व अपक्ष उमेदवार किरण दगडे व कुलदीप कोंडे यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या होत्या.

To Top