करंदी खे बा. मतदानाचा उच्चांक. आज पर्यंतच्या मतदानात विक्रमी मतदान

Maharashtra varta

 



नसरापूर( प्रतिनिधी):-

भोर विधानसभा मतदारसंघातील करंदी खे.बा.  ता.भोर या गावात  सर्वाधिक  एकूण 79.36% विक्रमी  मतदान झाले आहे.

आज बुधवार भोर विधानसभा   निवडणुक मतदानास  (दि. 20 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजता सुरूवात झाली. या दरम्यान  भोर विधानसभा मतदार संघातील भोर तालुक्यातील करंदी खे .बा. गावातील तरुणाईने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत  सहभागी होत, उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. सकाळी थंडीची व दुपारी उन्हाची काहिली जाणवत होती,मात्र तरुण ज्येष्ठ मतदार महिला पुरुषांनी सकाळची  व सायंकाळची थंडी- दुपारचे ऊन तहान सहन करत त्याची पर्वा न करता  मतदान प्रक्रियेत  भरभरून प्रतिसाद नोंदवला असल्याचे दिसून आले.

विधानसभा निवडणुकीत करंदी खे.बा. गावचे आजपर्यंत एवढे जास्त  मतदान झाले नाही, की जे या विधानसभा निवडणुकीत मतदान झाले,जवळजवळ 79.36%टक्के मतदान झाले,गावातील  नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. एका अर्थाने या निवडणुकीत तरुणाई केंद्रस्थानी राहिली. यावेळी तरुणाईची जास्त प्रमाणात लगबग दिसून येत होती. उन्हाचा तडाखा असतानाही तरुण मतदान केंद्रांवरील बुथवर मतदारांचे यादीत नाव आहे की नाही याची शहानिशा करत  समजावून सांगत होते. 

विधानसभा  निवडणुकीत करंदी खे.बा. येथील मतदारांनी मागील पंचवार्षिक काळामध्ये  विधानसभा  निवडणुकीत   74.67% टक्के मतदान केले होते,मात्र ह्या वर्षी 5 टक्के हुन अधिक वाढ झालेचे एकूण  मतदान टक्केवारीत दिसते.  करंदी खे .बा.तील एकूण मतदार  1073 असून त्यातील  850 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 466 पुरुष 384 स्त्रिया असे साडेआठशे जणांनी मतदान केले आहे. करंदी खे.बा.त वाढलेले मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर जाणार? हे येत्या 23 तारखेला आपल्याला समजणार आहे. यावेळेस मतदारांचा कल थोडासा वेगळाच असेल का? 




To Top