ढाण्या वाघ हा अजून रिंगणात आहे हे विसरू नका, जणू असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिला आहे. "बचेंगे तो और लढेंगे" असा इशाराच शरद पवारांनी दिला आहे. त्यांच्यातील हे फाईट स्पिरिट भल्याभल्यांना आचंबित करणारच नाहीतर एका वादळाची नांदी आहे, असं म्हटलं तरं वावगं ठरणार नाही, काय म्हणाले थोरले पवार
' आता महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीत पानिपत झालेले असताना, त्यांच्यातील सर्वात तरुण शरद पवार यांनी हार मानण्यास नकार दिला आहे. मी घरी बसणारा नाही, असा निर्धारच त्यांनी बोलून दाखवला. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील.' असा दुर्दम आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेने आता राष्ट्रवादीत पुन्हा नवीन उत्साह संचारला आहे. त्यामुळे 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय', असा थेट संदेश गेला आहे