करंदी खे.बा. गावातून 80 टक्क्यापेक्षा जास्त मतदान संग्राम थोपटे यांना करणार:-रणजित बोरगे ●आमदार संग्राम थोपटे यांचा करंदी खेबा येथे दौरा.

Maharashtra varta




नसरापूर (प्रतिनिधी):-न्यूज वार्ता मुख्य संपादक टी यादव

करंदी खे.बा.गावांत आमदार संग्राम थोपटे यांनी  कोट्यवधी रुपयांची विकास कामे केलेली आहेत , कामे मंजूर आहेत,ज्या ज्या वेळेस  गावच्या विकास कामे आम्ही घेऊन गेलो त्यावेळेस दादांनी ही सर्व विकासकामे मंजूर केलेले आहेत ,   900   हुन अधिक मतदानाचा असलेल्या आमच्या गावाला आज जवळजवळ सहा कोटीहुन अधिक रुपयाचा विकास निधी आमदार संग्राम थोपटे यांनी मंजूर  केला आहे, त्यामुळे आम्ही सर्व आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून 80 टक्के होऊन अधिक मतदान हे आमदार संग्राम थोपटे यांना आम्ही करणार आहे असे प्रतिपादन करंदी खे.बा.चे नागरिक व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रणजीत अण्णा बोरगे यांनी केले आहे.

महाविकास आघाडीचे भोर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा भोर तालुक्यात  प्रचार दौरा संपन्न होत असताना भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील  कंरदी खे.बा आमदार संग्राम थोपटे  ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या.त्यावेळेस रणजित बोरगे बोलत होते, ढोल ताशांच्या गजरात आमदार संग्राम थोटे यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. 

त्यानंतर

आमदार संग्राम थोपटे यांनी   करंदी  ग्रामस्थांशी संवाद  साधला.आमदार संग्राम थोपटे म्हणाले की,करंदी खे. बा. गावात आपण सातत्याने मायबाप जनतेची काम करत आलो आहेत. आपल्या करंदी खे.बा. गावासाठी कोट्यवधी रुपयाचा विकास निधी आपल्या गावच्या मूलभूत सेवा सुविधांसाठी दिलेला आहे, आपल्या गावच्या विकासासाठी कोण धावून येतं अशा उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभे रहा, मी या गावांमध्ये एक माझ्या स्वतःचं गाव या नात्याने या ठिकाणी विकास कामे केलेली आहे, आगामी काळात करंदी खे.बा.चे असणारे महत्त्वाचे प्रश्न देखील मी तुमच्या साक्षीनेच सोडवणार असल्याची ग्वाही भैरवनाथ मंदिरामध्ये देतो ,याचं कामाच्या जोरावर आज आपण जनतेपर्यंत जात आहोत. आपल्या परिसरातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्या महाविकास आघाडीने सर्वसमावेशक अशी पंचसूत्री निर्माण केली आहे. या पंचसूत्रीच्या माध्यमातून शेतकरी, तरुण वर्ग, महिला, सर्वसामान्य जनता सर्वच घटकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी येत्या २० तारखेला 'हाताचा पंजा' या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन  थोपटे यांनी यावेळी केले. 

याप्रसंगी भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे मा.सभापती लहू शेलार,मा.उपसभापती रोहन बाठे,भोर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली शिंदे,काँग्रेस पक्ष नेते माजी सरपंच माऊली पांगारे हिरामण पांगारे,

अरविंद सोंडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष गणेश खुटवड,शरद जाधव, अनिकेत शिंदे, दादा आंबवले, देवदत्त आबा कोंडे ,निलेश भोरडे, विशाल बंटी कोंडे,बापू पोळेकर,  खंडू भोरडे,भोर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते,महिला तरुण मित्र  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नेते अरविंद बोरगे , पुणे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य बोरगे, मा.सरपंच अलका तळेकर,भानुदास थिटे, सोपान काका बोरगे, नेवाप्पा बोरगे, तुळशीराम बापू थिटे ,तानाजी खाटपे, विठ्ठल खाटपे,राहुल बोरगे, शैलेश बोरगे ,संभाजी खाटपे , विजय कव्हे,नारायण बोरगे ,महेश खाटपे ,मनोज बोरगे,सुरेश बोरगे, विठ्ठल खाटपे, अक्षय खाटपे ,साहेबराव शिंदे, निखिल खाटपे, दत्ताभाऊ बोरगे संजय महाराज बोरगे, शिवाजी बापू माळवे,विजय बोरगे,  भालचंद्र कापरे व गावातील असंख्य ग्रामस्थ महिला तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्हा युवक युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य बोरगे ,पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष संजय महाराज बोरगे ,तुळशीराम बापू थिटे, रणजीत अण्णा बोरगे यांनी  यावेळेस मनोगत व्यक्त केले.



उपस्थितांचे स्वागत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तुळशीराम बापू थिटे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणजीत अण्णा बोरगे यांनी केले तर उपस्थित आमचे आभार सिद्धेश्वर गायकवाड यांनी मानले

To Top