भोर विधानसभा निवडणुकीत असणार 6 उमेदवार●

Maharashtra varta

 भोर विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर संग्राम थोपटे, शंकर मांडेकर, किरण दगडे, कोंडे यांच्यात चौरंगी लढत


(न्यूज वार्ता संपादक):-

भोर विधानसभा मतदार संघात संग्राम थोपटे, शंकर मांडेकर, किरण दगडे, कुलदीप कोंडे, अनिल जगताप, लक्ष्मण कुंभार हे ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत,

भोर विधानसभा निवडणुकीसाठी  ३१  उमेदवारांनी अर्ज भरले होते. या ३१ उमेदवारी अर्जाच्या कागदपत्राची छाननी केली असता कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने १६ अर्ज बाद करण्यात आले होते. यादरम्यान १५ उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरविण्यात आले होते. या १५ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ६ उमेदवारात निवडणूक होणार आहे. संग्राम अनंतराव थोपटे, शंकर हिरामण मांडेकर, कुलदीप सुदाम कोंडे, किरण दत्तात्रय दगडे, पियुशा किरण दगडे, प्रमोद पंडित बलकवडे, बाळासाहेब रामदास चांदेरे, भाऊ पांडुरंग मरगळे, राहुल चांगदेव पवार, सचिन सदाशिव देशमुख, समीर विठ्ठल पायगुडे, सूर्यकांत राजाराम माने, संजय भाऊसाहेब भेलके, अनिल संभाजी जगताप, लक्ष्मण राम कुंभार हे १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. एकंदरीतच आज फॉर्म माघारी घेण्याच्या दिवसावरून भोर विधानसभा निवडणुकीत सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे


To Top