महाविकास आघाडीच्या ताकतीवर आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहेत
न्यूज वार्ता :-संपादक राम पाचकाळे
भोर विधानसभा मतदार संघातील जनता प्रलोभनाला भुलणारी नाही हा माझा विश्वास आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जे जनतेला आमिष दाखवून काही दिले जाते त्याला भोरची स्वाभिमानी जनता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीच्या ताकतीवर आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहोत. जनतेचा आशीर्वाद देखील आपल्या सोबत आहे. युतीला ऐनवेळी जर उमेदवार आयात करावा लागत असेल तर त्यांच्याकडे अगोदर असलेल्या तालुक्यातील उमेदवाराची पात्रता युतीला समजली आहे ,असा घणाघात आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे.
भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील चिखलावडे खुर्द, चिखलावडे बुद्रुक, नांटबी येथे आमदार संग्राम थोपटे यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. तसेच चिखलावडे गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाचे दर्शन घेऊन दौऱ्यास सुरुवात केली.
ते पुढे म्हणाले की, चिखलावडे येथे मोठ्या प्रमाणात निधी देऊन जनतेच्या समस्या आपण सोडवल्या, यामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना, अंतर्गत रस्त्यांची मजबुतीकरण, विजेचे प्रश्न, शाळा आणि अंगणवाडी यासाठी निधी ही कामे आपण केली. नवीन असेल अथवा दुरुस्तीची कामं असतील ती प्रामाणिकपणे आपण करत आहोत. त्यामुळं इथली जनता आपल्या पाठीशी आहे. गेल्या वेळेस ७२ टक्के मतदान आपल्याला मिळालं होत यावेळी विकासकामांच्या जोरावर त्यात आणखीन वाढ होईल असा विश्वास वाटतो.
. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.