भोर तालुक्यात प्रथमच युवा संवाद संपन्न:-पृथ्वीराज थोपटे

Maharashtra varta

भोर तालुक्यात प्रथमच युवा संवाद संपन्न:-पृथ्वीराज थोपटे.



न्यूज वार्तासंपादक

युवकांना संबोधित करताना पृथ्वीराज भैय्या बोलले युवा ह्या देशाचा कणा आहे.तसेच पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दादा टापरे ह्यांनी ह्या वेळी युवकांना संबोधित करताना हि माती शुरवीरांची ह्या मातीने स्वराज्याचं देखण स्वप्न साकार केले आहे.युवा संवाद मेळाव्याच्या निमित्ताने भोर तालुक्यातील विविध भागातून युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल भोर येथे भोर, राजगड मुळशी तालुक्याचे युवा नेतृत्व पृथ्वीराज  थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी उपस्थित मान्यवर पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश  टापरे , भोर तालुका भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र  सांळूके, नवनिर्वाचित भोर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निखिल  बोडके भोर शहर विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष शुभम  शेटे भोर शहर सोशल मीडिया उपाध्यक्ष मंगेश गोळे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


To Top