त्या वक्तव्याचा संग्राम थोपटे यांनी नोंदवला निषेध. न्यूज वार्ताशी बोलताना संग्राम थोपटे यांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra varta

त्या वक्तव्याचा संग्राम थोपटे यांनी नोंदवला निषेध.

न्यूज वार्ताशी बोलताना संग्राम थोपटे यांनी दिली प्रतिक्रिया





भोर( प्रतिनिधी):-राम पाचकाळे
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात भाजपचे सुजेय विखे पाटील यांच्या सभेत त्यांचे निकटवर्तीय वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या स्नुषा डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या गलिच्छ वक्तव्यामुळे राज्यात  तीव्र स्वरुपाचे पडसाद उमटू लागले आहे. सर्वच स्तरावरून या गलिच्छ व्यक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. या प्रकरणी आता भोरचे काँग्रेसचे आमदारकीचे उमेदवार संग्राम थोपटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीताई यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान करण्यात आलं, त्याचा तीव्र निषेध नोंदवतो! "परस्त्रीला मातेसमान मानावे" हा शिवछत्रपतींचा संस्कार महाराष्ट्रात पायदळी तुडवण्याचे काम झाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. 


छत्रपतींच्या नावाने राजकारण करून त्यांच्या संस्कारांना तितांजली देणाऱ्या या महायुती सरकारला महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही. एकीकडे माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे तिला घराबाहेर पडू न देण्याची भाषा करायची या प्रवृत्तीला वेळीच ठेचायला हवे! अशी प्रतिक्रिया थोपटे यांनी  बोलताना  दिली आहे.

To Top